Home Minister Dilip Walse-Patil Indicated To Take Action Against Devendra Fadnavis

देवेंद्र फडणवीसांना भोवणार ‘ते’ प्रकरण? गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले कारवाईचे संकेत…

महाराष्ट्र मुंबई राजकारण

मुंबई : ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाची चौकशी प्रकरणी पोलिस ठाण्याला भेट देत पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप घेणे फडणवीस यांना अडचणीचे ठरू शकते. देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर दबाव टाकला असून हा सरकारी कामातील हस्तक्षेप आहे. या प्रकरणी काय कारवाई करता येईल याबाबतचा निर्णय सहकाऱ्यांशी चर्चा करून घेऊ, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

प्रसारमाध्यमांशी बोलताने गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हटले कि, ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाची चौकशी सुरू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे काही सहकाऱ्यांसोबत पोलीस ठाण्यात पोहोचले. तेथे फडणवीसांनी पोलिसांवर दबाव टाकला. हा शासकीय कामात हस्तक्षेप होता. त्यामुळे चौकशीत बाधा आली हे चुकीचे असून पुढील काळात अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. असेही वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडून गृहमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर या संदर्भात माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले. या कंपनीकडे असलेला रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा सरकारला देण्यात येणार नव्हता, तर तो एका खासगी पार्टीला देण्यात येणार होता. एफडीएने लसीचा पुरवठा करण्याची विनंती ब्रुक फार्माला केली होती. त्यावर त्याने नकार दिला होता. मात्र, त्यामुळे हा साठा कोणाला दिला जाणार होता, याची चौकशी करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, हा साठा पोलिसांनी जप्त केलेला नसल्याची माहितीही त्यांनी दिली.

ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला देवेंद्र फडणवीस यांनी दबाव टाकल्यामुळे सोडण्यात आलेले नसून त्याने परवानगीचे पत्र दाखवल्याने सोडण्यात आल्याचे वळसे-पाटील म्हणाले. त्यास चौकशीसाठी पुन्हा बोलावले जाईल, असे पोलिसांनी सांगितले असल्याचे ते म्हणाले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत