दिल्ली : देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिलं आहे. सिंग यांनी लसीकरणाची गती वाढवण्याचा सल्ला दिला आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधानांना 5 सल्ले दिले आहेत.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आपल्या पत्रात म्हटले कि, पुढील सहा महिन्यात राज्यांना कशापद्धतीने लस पुरवठा होईल याबाबत केंद्राने स्पष्टीकरण द्यावे. सरकारला सांगावं लागेल की, वेगवेगळ्या लस उत्पादक कंपन्यांना किती ऑर्डर देण्यात आली आहे. शिवाय अधिक लोकांना लस द्यायची असेल तर त्यासाठी अडवान्समध्ये ऑर्डर द्यायला हवी जेणेकरुन ऑर्डर वेळेत मिळेल. देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. पुन्हा जनजीवन कसं सुरळित होईल असं लोकांना वाटू लागलं आहे. महामारीवर मात करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. पण लोकांचे लसीकरण होणे सर्वात महत्त्वाचे आहे. असंही ते म्हणाले.
Former PM Dr Manmohan Singh writes PM Narendra Modi, “The key to our fight against COVID19 must be ramping up the vaccination effort. We must resist the temptation to look at the absolute numbers being vaccinated, and focus instead on the percentage of the population vaccinated pic.twitter.com/EVXPlQL5SR
— थोडक्यात घडामोडी : MARATHI NEWS – मराठी बातम्या (@thodkyaatnews) April 18, 2021
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिले 5 सल्ले :
- कोरोना काळात सरकार किती लशी कंपन्यांकडून घेत आहेत. ते सार्वजनिक करावे. कोणत्या कंपनीकडून किती लस घेण्यात आल्या तसेच कोणत्या कंपनीला किती लशींची ऑर्डर दिली हे लोकांना माहिती असावं.
- कोणत्या राज्याला किती लशी मिळाळ्यात याबाबत एक पारदर्शक फॉर्म्युला असावा.
- 45 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या फ्रंट लाईन वर्कर्संनाही लस देण्यात यावी. यासाठी वयाची मर्यादा असू नये. शिक्षण, चालक, पंचायत कर्मचारी, वकील या सर्वांना लस देण्यात यावी.
- लस निर्मात्या कंपन्यांना उत्पादनासाठी मदत व्हावी यासाठी पंतप्रधानांनी फंड द्यावे, तसेच इतर सवलती द्याव्यात.
- कोरोना लस निर्मितीसाठी लागणारे लायसन्स काही काळासाठी स्थगित करावे, जेणेकरुन अन्य कंपन्याही लशीची निर्मिती करु शकतील.




