इंडियन आर्मी : भारतीय सेना तांत्रिक प्रवेश योजना (TES) 10+2 प्रवेश 46 अभ्यासक्रमांसाठी भरती करत आहे. अधिसूचनेनुसार, भारतीय सेना TES 47 ऑनलाइन अर्ज लिंक 24 जानेवारी 2022 पासून सक्रिय होईल. इच्छुक उमेदवार 23 फेब्रुवारी 2022 पर्यंत किंवा त्यापूर्वी joinindianarmy.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात.
पात्रता
बारावीत किमान ६०% गुणांसह विज्ञान विषयात (गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र) १२वी उत्तीर्ण केलेली असावी. यासोबत उमेदवाराने JEE (मुख्य) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
वय मर्यादा
उमेदवाराचे किमान वय 16½ आणि कमाल वय 19½ वर्षे असावे.
निवड कशी होईल?
- यासाठी शॉर्टलिस्टेड अर्जदारांना बोलावले जाईल.
- SSB मुलाखत – ही दोन टप्प्यांची निवड प्रक्रिया आहे. जे स्टेज I क्लिअर करतील, ते स्टेज II वर जातील.
- वैद्यकीय परीक्षा – स्टेज उत्तीर्ण झालेल्यांसाठी ही परीक्षा घेतली जाईल. SSB द्वारे वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त घोषित केलेल्या उमेदवारांना सर्व पात्रता निकषांच्या पूर्ततेच्या अधीन राहून गुणवत्तेच्या क्रमाने प्रशिक्षणासाठी जॉइनिंग लेटर दिले जाईल.




