Actress Aisha Sultana

अभिनेत्री आयशा सुलतानावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल, मोदी सरकारविरुद्ध केलेले ‘ते’ वादग्रस्त वक्तव्य भोवले

देश राजकारण

लक्षद्वीप : अभिनेत्री आणि मॉडेल आयशा सुलताना हिच्यावर गुरुवारी लक्षद्वीप पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.  लक्षद्वीप बेटांच्या जनतेविरूद्ध मोदी सरकारने कोविड -१९ चा ‘जैव-शस्त्र’ म्हणून वापर केल्याचा वादग्रस्त दावा केल्याने आयशा सुलताना हिच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. भाजपाच्या लक्षद्वीप युनिटचे अध्यक्ष सी अब्दुल खादर हाजी यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे कावरट्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

केंद्र सरकार केंद्र शासित प्रदेशात कोविड -१९ चा जैव शस्त्र म्हणून वापर करत असल्याचा दावा केल्याबद्दल आयशा सुलताना हिच्याविरुद्ध कलम १२4 ए (देशद्रोह) आणि 153 बी (द्वेषयुक्त भाषण) अन्वये तक्रार दाखल केली गेली.

खादर यांनी आपल्या तक्रारीत लक्ष वेधले की चेतलात बेटाची रहिवासी असलेल्या आयशा सुल्ताना हिने हेतूपूर्वक असे म्हटले की केंद्र प्रफुल्ल पटेल यांचा या बेटावर जैव शस्त्र म्हणून वापरत करत आहे. एका मल्याळम वाहिनीवर नुकत्याच झालेल्या एका चर्चेचा हवाला खादर यांनी दिला, ज्यात आयशा सुलताना हिने अशा प्रकारच्या टिप्पण्या केल्या होत्या.

मल्याळम चॅनल मीडिया वनवरील चर्चेत आयशा सुलतानाने दावा केला होता कि, “केंद्राने काळजी घेण्यापूर्वी लक्षद्वीपवर कोविड -19 ची 0 प्रकरणे होती. परंतु, आता दररोज 100 प्रकरणे समोर येत आहेत. केंद्राने ‘जैव-शस्त्र’ (बायोवेपण) तैनात केलेले आहे. मी हे स्पष्टपणे सांगू शकते की केंद्र सरकारने लक्षद्वीपच्या लोकांविरूद्ध जैव-शस्त्र तैनात केले आहेत.”

दरम्यान, आयशा सुलताना हिच्या या वक्तव्यामुळे लक्षद्वीपमध्ये भाजप युतीने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी केरळमध्येही आयशाविरोधात अनेक तक्रारी दाखल केल्या आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत