Indian Navy instructor MiG-29K crashes in Arabian Sea
देश

भारतीय नौदलाचं प्रशिक्षक मिग-२९के विमान अरबी समुद्रात कोसळलं

भारतीय नौदलाचं प्रशिक्षक मिग-२९के विमान गुरुवारी अरबी समुद्रात कोसळलं आहे. अरबी समुद्रावरुन उड्डाण करत असताना विमान दुर्घटनाग्रस्त झालं. दुर्घटनेची माहिती मिळताच सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं. रेस्क्यू टीमने एका वैमानिकाला वाचवलं असून दुसऱ्या वैमानिकाचा शोध अद्याप सुरु आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

भारतीय नौदलाकडून यासंबंधी अधिकृत माहिती देण्यात आली आहे. “भारतीय नौदलाचं मिग-२९के प्रशिक्षक विमान २६ नोव्हेंबरला पाच वाजता दुर्घटनाग्रस्त झालं. एका वैमानिकाचा शोध लागला आहे, तर दुसऱ्या वैमानिकाचा हवाई तसंच समुद्रमार्गे शोध घेतला जात आहे. याप्रकरणी चौकशीचा आदेश देण्यात आला आहे,” अशी माहिती भारतीय नौदलाने दिली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत