lpg cylinder refill becomes easier chose distributor of your choice

मोठी बातमी : गॅस सिलिंडर भरणे होणार सोपे, आता हवा तो वितरक निवडता येणार, जाणून घ्या या सुविधेविषयी..

अर्थकारण देश

मुंबई : एलपीजी सिलिंडर रिफिल केल्यांतर त्याची घरपोच डिलिव्हरी होण्यासाठी आता ग्राहक आपल्या सोईनुसार वितरक निवडू शकतील. त्यामुळे ग्राहकांना कमी वेळेत लवकर सिलिंडर मिळण्यास मदत होईल. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय लवकरच नवी सुविधा सुरु करणार आहे. या सुविधेचे नाव डिजिटल एलपीजी पोर्टेबिलिटी असे आहे. या सुविधेनुसार ग्राहक आपल्या सोईनुसार एपीजी सिलिंडर वितरक निवडू शकतील.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

या सुविधेमध्ये डिजिटल एलपीजी पोर्टेबिलिटीद्वारे ग्राहक आपल्या मोबाईल APP किंवा पोर्टलच्या माध्यमातून लॉगीन करुन आपल्या सुविधेनुसार डिस्ट्रिब्यूटर निवडू शकतील. त्यासाठी सर्व डिस्ट्रिब्यूटर्सच्या रेटिंग्स आपल्यासमोर असतील. पहिल्या टप्प्यात ही सुविधा चंदिगड, कोयंबतूर, गुरगाव, पुणे आणि रांची या शहरात सुरु करण्यात येणार आहे. त्यानंतर या योजनेचा विस्तार इतर ठिकाणी केला जाईल.

या सुविधेमुळे ग्राहकांना कमी वेळेत सिलिंडर मिळण्यास मदत होईल. तसेच दुसऱ्या बाजूने जास्तीत जास्त ग्राहक मिळावेत म्हणून वितरकसुद्धा सर्वोत्तम सेवा देण्यासाठी तसेच चांगले रेटिंग मिळावेत म्हणून प्रयत्न करतील. याच कारणामुळे आगामी काळात वितरकांमध्ये स्पर्धा सुरु होणार आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत