pune mahatma phule mandai fire

पुण्यातील प्रसिद्ध ब्रिटिशकालीन महात्मा फुले मंडईला आग..

पुणे महाराष्ट्र

पुणे : पुण्यातील महात्मा फुले मंडईच्या आतील बाजूच्या छताला आग लागल्याची घटना घडली असून या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मध्य रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अग्निशमन दलाचे अधिकारी प्रदीप खेडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मा फुले मंडई ही ब्रिटिश कालीन वास्तू असून आतील बहुतांश भाग हा लाकडी आहे. या मंडईच्या आतील भागाच्या छताला रात्री १२ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती अग्निशामन दलाला मिळाली. त्यानुसार अग्निशामन दल घटनास्थळी जाऊन दाखल झाले. मात्र तोपर्यंत आतील काही भाग जळून खाक झाला होता. अग्नीशामन दल्याच्या तीन गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणली असून नेमकी आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही अशी माहिती अग्निशामन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलीय.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत