brazilian wife cuts her husband penis and cooks in a frying pan after argument about splitting up

विकृतीचा कळस! महिलेने पतीची हत्या केली, त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून पॅनमध्ये शिजवला…

क्राईम ग्लोबल

ब्राझील : ब्राझीलमधील एका महिलेला तिच्या पतीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या महिलेने तिच्या पतीची हत्या करून त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला आणि नंतर तो तेलात शिजवल्याचा आरोप आहे. ब्राझीलच्या साओ गोन्कालो शहरात ही खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी ३३ वर्षीय दयाने क्रिस्टीना रोड्रिग्स मचाडो या आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आरोपी महिलेच्या शेजार्‍यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा त्यांना आंद्रे नावाच्या व्यक्तीचा रक्तबंबाळ आणि नग्न अवस्थेतील मृतदेह आढळला. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पहाटे 4 वाजताच्या सुमारास या जोडप्यात विभक्त होण्यावरून वाद झाला, त्यानंतर या महिलेने पतीची हत्या केली. तिने तिच्या पतीचे लिंग कापले आणि ते पॅनमध्ये सोयाबीन तेलात शिजवले. पोलिसांनी घटनास्थळावरून भाजी कापण्याचा एक चाकू जप्त केला आहे. पोलिसांनी सांगितले की महिलेने त्याच चाकूने आपल्या पतीची हत्या केली.

महिलेने तिच्या 5 मुलींसह रेल्वेसमोर उडी मारून केली आत्महत्या, कारण…

मिळालेल्या माहितीनुसार, हे दाम्पत्य १० वर्षे एकत्र राहिल्यानंतर मागील २ वर्षांपासून मतभेदांमुळे वेगळे राहत होते. तरीदेखील हे दोघे एकमेकांच्या संपर्कात होते आणि नेहमी एकमेकांना भेटत असायचे. त्यांना एक आठ वर्षांचा मुलगा आणि एक पाच वर्षांची मुलगी आहे. गुन्हा घडला त्यावेळी ही मुले कोठे होती हे अद्याप समजू शकलेले नाही.

वृत्तानुसार, हे जोडपे गुन्हा घडला त्या रात्री बारमध्ये गेले होते. तिथे जेवण करताना आणि दारू पिताना दोघांमध्ये वाद झाला. या महिलेच्या वकीलांचा असा दावा आहे की तिचा नवरा आंद्रेने तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर या महिलेने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिच्या पतीचा खून केला. हे दोघेही एकत्र पिझ्झा शॉप चालवायचे असे सांगितले जात आहे.

भयंकर! भाजप नेत्याच्या मुलीवर सामुहिक बलात्कार, मुलीला मारहाण करून तिचा डोळा काढला आणि…

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत