brazilian singer mc kevin falls to death

गायक केव्हिनच्या मृत्यूप्रकरणात धक्कादायक खुलासा, गॅलरीत मॉडेलबरोबर करत होता रोमान्स तेवढ्यात…

ग्लोबल

ब्राझील : प्रसिद्ध गायक एमसी केव्हिन याचा काही दिवसांपूर्वी पाचव्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला होता. मात्र, आता या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा झाला आहे. केव्हिन गॅलरीत एका मॉडेलबरोबर रोमान्स करत होता, त्यावेळी अचानक त्याची पत्नी तेथे आली आणि घाबरल्यामुळे केव्हिन पाचव्या मजल्यावरून खाली पडला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

या घटनेच्या दोन आठवड्यांपूर्वीच केव्हिनने त्याची मैत्रीण डियोलेन बेजेराशी लग्न केले होते. केव्हिन आपल्या पत्नीची फसवणूक करीत होता आणि एका मॉडेलशी संबंध ठेवत होता. परंतु एका अत्यंत विचित्र परिस्थितीत केव्हिनला आपला जीव गमवावा लागला.

केविन त्याचा मित्र व्हिक्टरसोबत ब्राझीलच्या रिओ दि जानेरो येथी एका हॉटेलमध्ये गेला होता. या हॉटेलमध्ये त्याची भेट 26 वर्षीय मॉडेल बियान्काशी झाली. या सर्वांनी मिळून येथे ड्रग्सचे सेवन केले. त्यानंतर व्हिक्टरने बियांकाला पैशाच्या बदल्यात शरीरसंबंध ठेवण्याची ऑफर दिली. तथापि, केव्हिनने हे स्पष्ट केले की त्याने 33 वर्षीय डियोलेनशी लग्न केले आहे, त्यामुळे बियांकाने शरीरसंबंध ठेवल्याची गोष्ट गुप्त ठेवावी. मॉडेल बियांकाने सुरुवातीला यासाठी नकार दिला, परंतु थोड्या वेळाने बियान्का तयार झाली आणि म्हणाली की व्हिक्टर आणि केव्हिन या दोघांना तिला 390-390 डॉलर्स द्यावे लागतील.

प्रसिद्ध गायक केव्हिनचा पाचव्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू, दोन आठवड्यांपूर्वीच केलं होतं लग्न

दरम्यान, त्याच हॉटेलमध्ये राहणारी क्रूझ नावाची एक व्यक्ती केव्हिनकडे आली. जेव्हा क्रूझला या ऑफरबद्दल समजले, तेव्हा तो त्याला ऑफरमध्ये सामील करून घ्या, असं म्हणू लागला. तथापि, व्हिक्टर आणि केव्हिन यांनी त्याला पळवून लावले. क्रूझने जाता-जाता केव्हिनच्या सुरक्षा रक्षकाला सांगितले की केव्हिनची पत्नी त्याचा शोध घेत आहे.

केव्हिनची पत्नी डियोलेनही या हॉटेलमध्ये थांबली होती. केव्हिनला याबद्दल माहित नव्हते, परंतु क्रूझला हे माहित होते. यानंतर, केव्हिनच्या सुरक्षा रक्षकाने व्हिक्टरला संदेशही दिला की केव्हिनची पत्नी त्याचा शोध घेत आहे. व्हिक्टरने केव्हिनला याबद्दल सांगितले, परंतु केव्हिनने याकडे दुर्लक्ष केले. काही काळानंतर व्हिक्टर वॉशरूममधून बाहेर येत असताना त्याने पाहिले की केव्हिनची पत्नी त्याच्या खोलीत आली आहे. त्यावेळी केव्हिन बाल्कनीत लटकून स्वत: ला लपविण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु या गोंधळात त्याचा पाय घसरला आणि तो पाचव्या मजल्यावरून थेट खाली पडला.

त्यानंतर केव्हिनला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले जेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. केव्हिनचे ​​इंस्टाग्रामवर 10 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि तो सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव होता. मात्र, या प्रकरणात बियान्कावर सोशल मीडियावर अनेक प्रकारचे आरोप केले जात आहेत. तिने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले कि, “लोक मला जज करीत आहेत, परंतु त्यांना हे समजले पाहिजे की मी केव्हिनकडे गेले नव्हते तर केव्हिन माझ्याकडे आला होता. कोणत्याही सामान्य व्यक्तीप्रमाणेच, या घटनेनंतर मलाही धक्का बसला आहे.”

Cyclone Tauktae : पी -305 जहाज बुडाल्याप्रकरणी कॅप्टनसह अनेक जणांविरोधात गुन्हा दाखल

ब्रेकिंग : तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांची 8 वर्षानंतर बलात्कार प्रकरणात निर्दोष मुक्तता

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत