अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार विभागाच्या प्रवक्ता मॉर्गन ऑर्टागस यांनी म्हटले आहे की, एकटी अमेरिका जागतिक आव्हानांना सामोरे जाऊ शकत नाही. त्यासाठी भारताची साथ खूप महत्वाची आहे. दोघेही संयुक्तपणे मजबूत आणि सुरक्षित राष्ट्र आहेत. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी दोन्ही देश एकत्रितपणे कार्य करीत आहेत.
ऑर्टागस म्हणाल्या की, अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाले आहेत. भविष्यात दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ आणि मजबूत बनतील. दोन्ही देशांमधील संबंध राजकीय पक्षांच्या पार्टी लाइनपेक्षा वरचे आहेत. कोणत्याही प्रशासनासाठी हे आवश्यक असेल. 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक किंवा रिपब्लिकन पार्टी या दोन्हीपैकी कोणाचाही विजय झाला तरी, भारताशी चांगले संबंध राखले जातील. यामागील धारणा अशी आहे की अमेरिकन लोकांना हे माहित आहे की अमेरिका आणि भारत एकत्र खूप मजबूत स्थितीत आहेत. दोघेही एकत्रितपणे अधिक सुरक्षित आहेत.
ऑर्टॅगस पुढे म्हणाल्या की, आम्हाला माहित आहे की येत्या 10 वर्षांत जागतिक आव्हानांचे आकार वाढतील. ही आव्हाने अधिक जटिल असतील. एकट्या अमेरिकेलाच या आव्हानांना सामोरे जात येणार नाही. हे काम आम्हाला आमच्या भागीदारांसह करावे लागेल. भारताशी आमची जागतिक भागीदारी मोठी होणार आहे. लोकशाही प्रक्रियेच्या दृष्टीने दोन्ही देश समान आहेत. भारत आणि अमेरिका हे जगातील सर्वात मोठे लोकशाहीप्रधान देश आहेत. दोन्ही देशांमधील समान मूल्ये अमेरिका आणि भारत यांना एक समान व्यासपीठ प्रदान करतात.