वॉशिंग्टन : अफगाणिस्तानच्या एका महिलेने अमेरिकेच्या सी -17 ग्लोबमास्टर या विमानामध्ये बाळाला जन्म दिला आहे. अफगाणिस्तानातून सुटका करण्यात आलेल्या इतर नागरिकांसोबत ही महिला अमेरिकेत जात होती. मात्र, विमानातच महिलेला विमानात प्रसूती वेदना सुरू झाल्या. हवेचा दाब वाढल्याने वैमानिकाने विमान उतरवण्याचा निर्णय घेतला. रामस्टीन एअर बेसवर पोहोचताच या महिलेने विमानामध्ये बाळाला जन्म दिला.
अमेरिकेच्या हवाई दलाच्या जवानांनी जर्मनीतील रामस्टीन विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केले. लँडिंग होताच वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी महिलेची प्रसूती केली. अमेरिकेच्या एअर मॉबिलीटी कमांडने यासंदर्भात ट्विट करत सांगितले की आई आणि बाळ दोघेही स्वस्थ आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
During a flight from an Intermediate Staging Base in the Middle East, the mother went into labor and began having complications. The aircraft commander decided to descend in altitude to increase air pressure in the aircraft, which helped stabilize and save the mother’s life.
— Air Mobility Command (@AirMobilityCmd) August 21, 2021
अमेरिकन लष्कराने सांगितलं कि, “विमान हवेत उंचावर उडत असताना विमानात ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने या महिलेला त्रास होऊ लागला. विमान कमांडरने विमानातील हवेचा दाब वाढवण्यासाठी उंचावर विमान उतरवण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे आईचे आणि बाळाचे प्राण वाचवण्यात मदत झाली.”




