corona booster dose

कोरोना लसीचा बूस्टर डोस किती प्रभावी? ‘या’ अहवालात झालं स्पष्ट

कोरोना ग्लोबल

नवी दिल्ली : जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा धोका टाळण्यासाठी लसीचा बूस्टर डोस देण्याची तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाच्या अभ्यासातून असे समोर आले आहे की कोरोना लसीचा बूस्टर डोस कोविड 19 चा धोका कमी करण्यासाठी बऱ्याच प्रमाणात प्रभावी आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना संसर्ग रोखण्यासाठी आणि गंभीर आजारी पडण्यापासून रोखण्यासाठी फायझरचा (Pfizer) तिसरा डोस पूर्वीपेक्षा अधिक प्रभावी आहे. अभ्यासानुसार, 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या ज्या लोकांना तिसरा डोस दिला गेला, त्यांना दोन डोस घेणाऱ्यांच्या तुलनेत संसर्गाविरुद्ध लढण्यात 4 पट अधिक संरक्षण मिळाले. त्याचप्रमाणे, तिसरा डोस घेणाऱ्यांमध्ये गंभीर आजारी पडण्याचे किंवा दवाखान्यात ऍडमिट होण्याचे प्रमाण 5 ते 6 पट कमी होते.

इस्रायलने गेल्या वर्षी डिसेंबरपासून लसीकरण मोहीम सुरू केला. आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की कालांतराने कोरोना विरूद्ध प्रतिकारशक्ती कमकुवत होत जाते. त्यामुळे आता इस्राईलमध्ये 40 वर्षांवरील सर्वांना लसीचा तिसरा डोस दिला जात आहे. जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचे संक्रमण पुन्हा एकदा वाढत आहे, त्यानंतर अनेक देशांनी बूस्टर डोस देण्याची घोषणा केली आहे. अलीकडेच, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे की 20 सप्टेंबरपासून सर्व लोकांना मोफत बूस्टर डोस दिला जाईल. अमेरिकेशिवाय कॅनडा, फ्रान्स आणि जर्मनीसारख्या देशांमध्ये बूस्टर डोस देण्याची तयारी केली जात आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत