Remove These Eight Fraud Apps From Your Android Devices Immediately
गॅझेट्स

गुगल प्ले स्टोअरकडून फसवणूक करणाऱ्या ‘या’ Apps वर बंदी, तात्काळ करा डिलीट

नवी दिल्ली : सध्या अनेक लोक बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरंसी मध्ये गुंतवणूक करीत आहेत. परंतु, काहीजण याचा गैरफायदा घेत असून क्रिप्टोकरंसीच्या नावाखाली अनेकांची फसवणूक होत आहे. त्यातच आता स्मार्टफोनमधील काही धोकादायक ऍप्स समोर आले आहेत. गुगलने अशा प्रकारच्या ८ ऍप्सवर बंदी घातली आहे, जे क्रिप्टोकरंसीच्या नावावर लोकांची फसवणूक करीत होते. गुगल प्ले स्टोअरवरून हे ८ ऍप्स हटवण्यात आले आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सिक्योरिटी फर्म Trend Micro च्या रिपोर्टनुसार, हे ८ धोकादायक ऍप्स जाहिरात दाखवून आणि सब्सक्रिप्शन सर्विसचा चार्ज घेवून साधारण ११०० रुपये महिना आणि अतिरिक्त चार्ज आकारून युजर्संची फसवणूक करत होते. ट्रेंड मायक्रोने याविषयी गुगल प्ले ला माहिती दिल्यानंतर हे ऍप्स प्ले स्टोअरवरून हटवण्यात आले असून त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. परंतु, तुम्ही जर हे ऍप डाउनलोड केले असेल, तर ते अजूनही तुमचे नुकसान करू शकते. त्यामुळे ते तात्काळ डिलीट करणे आवश्यक आहे.

गुगल प्ले स्टोरवरून हटवलेले ऍप्स :

  1. BitFunds – Crypto Cloud Mining
  2. Bitcoin Miner – Cloud Mining
  3. Bitcoin (BTC) – Pool Mining Cloud Wallet
  4. Crypto Holic – Bitcoin Cloud Mining
  5. Daily Bitcoin Rewards – Cloud Based Mining System
  6. Bitcoin 2021
  7. MineBit Pro – Crypto Cloud Mining & btc miner
  8. Ethereum (ETH) – Pool Mining Cloud

रिपोर्टमध्ये हेही म्हटले आहे की, या अॅप्सने जुलै २०२० पासून २०२१ पर्यंत जगभरात ४५०० हून जास्त युजर्संना टार्गेट केले आहे. तसेच १२० पेक्षा जास्त नकली क्रिप्टोकरंसी ऑनलाइन ऍप्स अजूनही उपलब्ध आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत