Samsung Galaxy M12 smartphone

Samsung Galaxy M12 स्मार्टफोन भारतात लवकरच होणार लॉन्च, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

गॅझेट्स तंत्रज्ञान

नवी दिल्ली : भारतात Samsung Galaxy M12 हा स्मार्टफोन ११ मार्च रोजी लॉन्च करण्यात येणार आहे. ११ मार्चला दुपारी १२ वाजता होणाऱ्या एका इव्हेंटमध्ये या स्मार्टफोनला लॉन्च करण्यात येणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम 12 हा स्मार्टफोन ११ मार्च रोजी सॅमसंग डॉट कॉम, अॅमेझॉन आणि रिटेल आउटलेटवर उपलब्ध होईल. कंपनीने नवीन फोनसाठी डेडिकेटेड मायक्रोसाईटही स्थापित केली आहे. लॉन्चपूर्वी सॅमसंगने गॅलेक्सी एम १२ चे काही स्पेसिफिकेशन्स सांगितले आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

Samsung Galaxy M12 स्पेसिफिकेशन्स :

  1. या फोनमध्ये 6000mAh बॅटरी देण्यात येणार आहे.
  2. ६.५ इंचाचा एचडी + इनफिनिटी व्ही डिस्प्ले 90 हर्ट्जच्या रीफ्रेश रेटसह उपलब्ध असेल.
  3. गॅलेक्सी एम १२ मध्ये ट्रू ४८ मेगापिक्सलचा क्वॉड कॅम ISOCELL Plus टेक्नोलॉजी दिली जाणार आहे.
  4. 8nm एक्सीनॉस प्रोसेसर
  5. 3.5 मिमी हेडफोन जॅक
  6. USB टाइप-सी पोर्ट
  7. साइड-माऊंट फिंगरप्रिंट सेन्सर
  8. या फोनमध्ये 48-मेगापिक्सलचा क्वाड-कॅमेरा सेटअप ISOCELL Plus टेक्नॉलॉजि आणि GM2 सेंसर सोबत उपलब्ध असेल. ५ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड, 2 मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला जाण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे.
  9. हा फोन तीन स्टोरेज व्हेरियंटमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. गॅलेक्सी एम १२ च्या बेस व्हेरियंटमध्ये 3 जीबी रॅम + 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज मिळू शकते. दुसऱ्या व्हेरियंटमध्ये ४ जीबी रॅम + ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज याशिवाय, ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंट मिळू शकते.
  10. हा फोन आकर्षक ब्लॅक, एलिगंट ब्लू आणि ट्रेंडी पन्ना ग्रीन कलर ऑप्शन्समध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत