Schedule messages on WhatsApp

WhatsApp वर मेसेज करू शकता शेड्यूल, जाणून घ्या सोपी पद्धत

तंत्रज्ञान

नवी दिल्ली : प्रसिद्ध मेसेजिंग अॅप WhatsApp चा वापर आपण सर्वजण फोटो आणि व्हिडीओज शेअर करण्यासाठी आणि मेसेजेस करण्यासाठी करतो. बर्‍याचदा एखाद्या खास मित्र किंवा कुटुंबातील सदस्याला वाढदिवस किंवा ऍनिव्हर्सरीच्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्याला रात्री उशीरापर्यंत जागे राहावे लागेल. अशा परिस्थितीत आपण एक खास युक्तीचा वापर करू शकता, ज्याद्वारे मेसेज आपोआप पाठविला जाईल आणि आपल्याला रात्री उशिरापर्यंत जागण्याची गरज पडणार नाही. यासाठी आपण मेसेज शेड्यूल करून ठेवू शकतो.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

WhatsApp चा मेसेज शेड्यूल कसा करावा :

व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेजेस शेड्यूल करण्यासाठी आपल्याला थर्ड पार्टी अ‍ॅपचा सहारा घ्यावा लागतो, कारण सध्यातरी मेसेजिंग अॅप प्लॅटफॉर्मवर मेसेजेस शेड्यूल करण्याची सुविधा उपलब्ध नाही.

  1. सर्व प्रथम, Google Play Store वर जा आणि SKEDit अ‍ॅप डाउनलोड करा.
  2. SKEDit अ‍ॅप उघडल्यानंतर लॉग इन करा.
  3. येथे आपणास मेनू दिसेल, त्यात व्हॉट्सअॅपचा पर्याय निवडा.
  4. Enable Accessibility वर टॅप करुन SKEDit वर जाऊन toggle चालू करा.
  5. त्यानंतर Allow वर क्लिक करा.
  6. आता अ‍ॅप वर परत जा.
  7. येथे तुम्हाला Ask Me Before Sending हा पर्याय दिसेल. आपण ते ऑन केल्यास, मेसेज पाठविण्यापूर्वी आपल्याला एक नोटिफिकेशन मिळेल, ज्यावर टॅप केल्यानंतरच मेसेज पाठविला जाईल. आपण ते ऑफ केल्यास मेसेज आपोआप पाठविला जाईल.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत