Remove These Eight Fraud Apps From Your Android Devices Immediately

Alert ! आपल्या स्मार्टफोनमधील ‘हे’ प्रसिद्ध 9 Android Apps तात्काळ करा डिलीट

गॅझेट्स तंत्रज्ञान

नवी दिल्ली : Doctor Web च्या रिपोर्टवरून, अशा 9 अँड्रॉयड ऍप्सची माहिती समोर आली आहे की, जी फेसबुक युजरच्या लॉग इन आयडी आणि पासवर्ड चोरी करू शकते. डॉक्टर वेबच्या तज्ज्ञांनुसार, हे वायरसचे मोबाइल App खूपच धोकादायक आहेत. हे ९ App असे आहेत, ज्यात मॅकेनिज्मचा वापर करण्यात आला आहे. याचा वापर सेटिंग्सच्या परवानगी नंतर वैध फेसबुक वेब पेज https://www.facebook.com/login.php ला वेबव्ह्यू मध्ये अपलोड करते. यानंतर हे App जावा स्क्रीप्ट द्वारे फेसबुक युजरची लॉगइन -आयडी आणि पासवर्ड चोरी करते. आता हे ९ मोबाइल ऍप गुगल प्ले स्टोअरवरून हटवण्यात आले आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

  1. PIP Photo
    हे एक फोटो एडिटिंग App आहे. या App ला Lillians ने तयार केले आहे. गुगल प्ले स्टोअरवरून आतापर्यंत 1,000,000 हून जास्त वेळा डाउनलोड करण्यात आले आहे.
  2. Processing फोटो
    या मोबाइल App ला गुगल प्ले स्टोरवरुन 5,000,000 हून जास्त वेळा डाउनलोड करण्यात आले आहे. या मोबाइल अॅपला chikumburahamilton ने बनवले आहे.
  3. Horoscope दैली
    1,000,000 हून अधिक युजर्संनी या अॅपला डाउनलोड केलेले आहे. या मोबाइल App ला HscopeDaily momo ने बनवले आहे.
  4. Rubbish क्लिनर
    हे एक परफॉर्मन्स ऑप्टिमायजर App आहे. या अॅपला 1,000,000 हून जास्त वेळा डाउनलोड करण्यात आले आहे. याला SNT.rbcl ने बनवले आहे.
  5. App Lock कीप
    गुगल प्ले स्टोरवर या Appला ५ हजारहून जास्त युजर्संनी डाउनलोड केले आहे. या App ला Sheralaw Rence ने बनवले आहे.
  6. Inwell फिटनेस
    हे एक फिटनेस App आहे. या अॅपला 5,000,000 हून जास्त वेळा डाउनलोड करण्यात आले आहे. हे App कुणी बनवले याची माहिती मिळाली नाही.
  7. Horoscope पी
    या App ला गुगल प्ले स्टोरवरून १ हजारांहून जास्त युजर्संनी डाउनलोड केलेले आहे. या मोबाइल App ला Talleyr Shauna ने बनवले आहे.
  8. Lockit मास्टर
    या मोबाइल अॅपला 5,000,000 वेळा डाउनलोड करण्यात आले आहे. याची जास्त माहिती मिळाली नाही.
  9. App Lock मॅनेजर
    हे App Implummet col ने बनवले आहे.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत