Explosion and fire reported near oil field in Caspian Sea

अजरबैझानच्या कॅस्पियन समु्द्रात भीषण स्फोट

ग्लोबल

बाकू : अजरबैझानच्या कॅस्पियन समु्द्रात भीषण स्फोट झाला आहे. हा स्फोट तेल आणि नैसर्गिक वायू असलेल्या भागात झाला आहे. या भीषण स्फोटामुळे आगीचे प्रचंड लोळ उठले. हा स्फोट नैसर्गिक वायूचा साठा असलेल्या कॅस्पियन समुद्रात झाला. या भीषण स्फोटाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

या स्फोटाबाबत अजरबैझानकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. अजरबैझानच्या सरकारी तेल कंपनीने स्फोटामागे ‘मड वॉल्केनो’ कारणीभूत असण्याची शक्यता असल्याचे म्हटले होते. मात्र, काही वेळेनंतर त्यांनी हे वक्तव्य मागे घेतले. दरम्यान, अझरबैजान कॅस्पियन शिपिंग कंपनीने रविवारी संध्याकाळी जाहीर केले की त्यांच्या कोणत्याही जहाजांवर स्फोट झालेला नाही.

रविवारी संध्याकाळी कॅस्परियन समुद्रात मोठा स्फोट व आग लागल्याची नोंद झाली असून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्फोटाची तीव्रता दिसत आहे. हा स्फोट कशामुळे झाला, याबाबत माहिती मिळाली नाही. मंत्रालयाने या घटनेचा तपास सुरु केला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत