Bhatkhalkar tweeted and compared Uddhav Thackeray to Congress leader Rahul Gandhi

‘यांच्यापेक्षा राहुल गांधी बरे’… भाजप आमदार अतुल भातखळकर यांचे ट्वीट चर्चेत

महाराष्ट्र मुंबई राजकारण

मुंबई : विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. मात्र, अधिवेशनाच्या अगोदर पत्रकारांना संबोधित न केल्याबद्दल भाजपनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी या संदर्भात ट्वीट करत उद्धव ठाकरेंची तुलना काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

भातखळकर यांनी ट्वीट करत म्हटलं आहे कि, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधिमंडळ अधिवेशनापूर्वी पत्रकारांना संबोधित करण्याचे धाडस झालेले नाही. १७० आमदार पाठीशी असताना इतकेही बळ नसेल तर उपयोग काय? यांच्यापेक्षा राहुल गांधी बरे.”

राज्यात पावसाळी अधिवेशनाची घोषणा झाल्यापासून भाजपने सरकारला घेरायला सुरुवात केली आहे. अधिवेशनाचा कालावधी वाढवावा व विधानसभा अध्यक्षांची निवड लवकरात लवकर केली जावी, अशा मागण्या भाजपकडून सतत केल्या जात आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी थेट राज्यपालांची भेट घेतली होती. राज्यपालांनीही तत्परतेनं फडणवीसांच्या मागण्यांची दखल घेत मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहित मागण्यांवर कार्यवाही करण्याची मागणी केली होती. अधिवेशनापूर्वी सरकारवर दबाव आणण्याची भाजपची ही रणनीती असून भातखळकर यांनी केलेली टीका याचाच एक भाग असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत