Underground tanks for rain water storage, Aditya Thackeray reviewed the work
महाराष्ट्र मुंबई

हिंदमाता परिसरात साचणारे पावसाचे पाणी साठविण्यासाठी भूमिगत टाक्या

मुंबई : पावसाचे अधिकचे पाणी साठवण्यासाठी परळ येथील झेवियर्स मैदान व प्रमोद महाजन कला पार्क या ठिकाणी तयार होत असलेल्या भूमिगत टाक्यांच्या पहिल्या टप्प्यातील कामाचा आढावा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला. ही कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मुंबईची भौगोलिक स्थिती आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे थोड्या कालावधीत होणारा प्रचंड पाऊस लक्षात घेता सखल भागात पाणी साचून समस्या निर्माण होते. त्यावर उपाय म्हणून अधिक पावसाच्या वेळी दोन्ही टाक्यांमध्ये हिंदमाता परिसरात साचणारे पाणी पंपांच्या साहाय्याने आणून साठवले जाणार आहे. यामुळे हिंदमाता परिसरात रस्त्यावर पाणी साचल्याने निर्माण होणारी समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत