नवी दिल्ली : लोकप्रिय कंपनी Xiaomi लवकरच Mi TV 6 स्मार्ट टीव्ही लॉन्च करणार आहे. या टीव्हीचे फीचर्स जबरदस्त आहेत. Xiaomi Mi TV ६ हा स्मार्ट टीव्ही ४८ मेगापिक्सल कॅमेऱ्यासोबत सादर करण्यात येणार आहे. या टीव्हीत दोन कॅमेरे मिळतील. लॉन्चच्या आधीच एमआय टीव्ही ६ चे स्पेसिफिकेशन्स डीटेल्स लीक होत आहे. यातील मुख्य फीचर कॅमेऱ्याचेच आहे. शाओमी अपकमिंग स्मार्ट टीव्ही ‘new interactive mode’ या टॅगलाइनसोबत सादर करेल.
सध्या अँड्राइड स्मार्ट टीव्हीवरून व्हिडीओ कॉलिंग वाढले आहे. अशात शाओमी ग्राहकांसाठी असा स्मार्ट टीव्ही आणत आहे, ज्यात स्मार्टफोन्सचा देखील आनंद घेता येईल. Mi TV 6 फ्लॅगशिप स्मार्ट टीव्ही २८ जूनला चीनमध्ये लॉन्च होईल. पहिल्यांदाच शाओमी आपल्या टीव्हीमध्ये ड्युअल कॅमेरा देणार आहे. या टीव्हीला लवकरच चीन आणि भारतासह इतर देशात लॉन्च केले जाईल.
फीचर्स :
- Xiaomi Mi TV 6 च्या संभाव्य फीचर्सबद्दल सांगायचे तर याच्या डिस्प्लेमध्ये QLED Quantum Dot Technology चा वापर केला जाईल.
- Dolby Vision IQ ने सुसज्ज असेल. यामुळे टीव्ही आपोआप अँबिएंट लाइटला एडजस्ट करतो.
- एमआय टीव्ही ६ मध्ये स्पेशल ऑडिओसोबत ४.२.२ सराउंड साउंड मिळेल. यात १०० वॉटचा इन-बिल्ट स्पीकर वाय-फाय ६, दोन एचडीएमआय पोर्ट, गेमिंगसाठी एएमडी फ्रींसिक प्रीमियमसह अनेक खास फीचर्स मिळतील. पुढील काही दिवसात या टीव्हीचे आणखी फीचर्स समोर येतील.