पुणे : नोकिया स्मार्टफोन Nokia 2 V Tella लाँच, हे नोकिया २ व्हीचे अपडेट मॉडल आहे. ज्यात ड्यूल रियर कॅमेरा, स्लीम बेजल्स आणि दोन दिवसांची बॅटरी लाइफ यासारखे खास वैशिष्ट्ये आहेत. कंपनीने फोनला सध्या यूएसमधील बाजारात उतरवले आहे.
हा स्मार्टफोन एकाच कलर ऑप्शनमध्ये आणि एकाच रॅम प्लस स्टोरेज ऑप्शन मध्ये आणला आहे. अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणाऱ्या या फोनमध्ये २ जीबी रॅम प्लस १६ जीबी स्टोरेज दिला आहे. फोनची किंमत १६८ डॉलर म्हणजेच १२ हजार ४०० रुपये किंमत आहे. फोन ब्लू कलर मध्ये येतो.
Nokia 2 V Tella चे फीचर्स
- सिंगल सिम
- ५.४५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले
- २ जीबी रॅम
- मीडियाटेक हीलियो ए २२ प्रोसेसर
- १६ जीबी स्टोरेज
- मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबी पर्यंत वाढवता येवू शकतो.
- अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टमवर
- दोन दिवसांची बॅटरी लाइफ
- फोनमध्ये गुगल असिस्टेंट साठी बटन दिले आहे.
- दोन रियर कॅमेरे आणि सिंगल फ्रंट कॅमेरा
- ८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर
- २ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर
- सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
- 3,000mAh बॅटरी




