TRP scam
महाराष्ट्र मुंबई

टीआरपी घोटाळा : आणखी दोन वाहिन्यांचा सहभाग स्पष्ट, मालकांना अटक

मुंबई : टीआरपी घोटाळ्यात आणखी दोन वाहिन्यांचा सहभाग स्पष्ट झाल्याचा दावा गुन्हे शाखेने बुधवारी केला. याआधी रिपब्लिक, फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या तीन वाहिन्यांचा घोटाळ्यातील सहभाग स्पष्ट झाल्याचा दावा पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

फक्त मराठी आणि  बॉक्स सिनेमाच्या मालकांना विशेष पथकाने अटक केली आहे. तर रिपब्लिक वृत्तवाहिनीच्या वितरण आणि संपादकीय विभागातील अनेकांना समन्स जारी करून विशेष पथकाने चौकशीसाठी बोलावले आहे

गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाकडून टीआरपी घोटाळ्याचा तपास सुरू असून याप्रकरणी नोंद गुन्ह्य़ात पुरावा नष्ट करणे, पुरावा म्हणून वापर होईल अशी कागदपत्रे नष्ट करणे, समन्स किंवा नोटिशीतील सूचना न पाळणे आणि चौकशीस सहकार्य न करणे आदी कलमे वाढविण्यात आल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत