Dilip Walse Patil

पोलीस पदोन्नतीच्या आदेशाला स्थगिती, पाच पोलीस अधिकाऱ्यांची पदोन्नती रोखली

महाराष्ट्र मुंबई

मुंबई : राज्यातील प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नती संदर्भात गृहमंत्रालयाकडून काढण्यात आलेल्या आदेशाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. गृहमंत्रालयाने बुधवारी रात्री यासंदर्भातील आदेश जारी केला होता. मात्र, अवघ्या काही तासांमध्येच काही पोलीस अधिकाऱ्यांची पदोन्नती रोखण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. वृत्तानुसार, गृहमंत्रालयाच्या यादीत नाव असणाऱ्या मुंबई आणि ठाण्यातील पाच पोलीस अधिकाऱ्यांची पदोन्नती रोखण्यात आली आहे. यासंदर्भात गृहमंत्रालय किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

राज्यातील विशेष पोलीस महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक आणि अधीक्षक दर्जाच्या ३७ अधिकाऱ्यांच्या बुधवारी बढत्या आणि बदल्या करण्यात आल्या होत्या. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहआयुक्त म्हणून सुहास वारके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेची जबाबदारी उत्तर मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांच्याकडे सोपविण्यात आली होती. पश्चिम विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे पुण्याचे सहआयुक्त झाले होते. तर नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची बदली करून जयंत नाईकनवरे यांना नाशिकच्या आयुक्तपदाची धुरा देण्यात आली होती.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत