मुंबई : राज्यातील प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नती संदर्भात गृहमंत्रालयाकडून काढण्यात आलेल्या आदेशाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. गृहमंत्रालयाने बुधवारी रात्री यासंदर्भातील आदेश जारी केला होता. मात्र, अवघ्या काही तासांमध्येच काही पोलीस अधिकाऱ्यांची पदोन्नती रोखण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. वृत्तानुसार, गृहमंत्रालयाच्या यादीत नाव असणाऱ्या मुंबई आणि ठाण्यातील पाच पोलीस अधिकाऱ्यांची पदोन्नती रोखण्यात […]

