Latur Farmer Dies in Harvester Accident: Essential Safety Tips for Using Farm Machinery
महाराष्ट्र

लातूरमध्ये हार्वेस्टर मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, धोकादायक यंत्रे वापरताना घ्या आवश्यक काळजी

लातूर : औसा तालुक्यातील आशिव येथे ऊसतोडीसाठी वापरण्यात येणाऱ्या हार्वेस्टर मशीनमध्ये अडकून शंकर प्रभाकर सावंत (वय ४०) या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. बाजूला पडलेला ऊस मशीनमध्ये टाकताना त्यांचा तोल जाऊन ते मशीनमध्ये अडकले. सहकाऱ्यांनी मशीन बंद केले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे. मृत शेतकरी हा कुटुंबाचा कर्ता असल्याने पत्नी व दोन लहान मुलांवर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, हार्वेस्टर वापरताना योग्य प्रशिक्षण व सुरक्षिततेच्या उपाययोजना राबवाव्यात, तसेच मृताच्या कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

या अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून हार्वेस्टरसारखी धोकादायक यांत्रिक साधने वापरताना काळजी व प्रशिक्षण अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हार्वेस्टर वापरताना घ्यावयाची अत्यंत महत्त्वाची काळजी

  • हार्वेस्टर चालवणाऱ्या चालकास अधिकृत प्रशिक्षण असणे बंधनकारक
  • मशीन सुरू असताना कोणत्याही व्यक्तीने जवळ जाणे टाळावे
  • बाजूला पडलेला ऊस किंवा कचरा हाताने मशीनमध्ये टाकू नये
  • सैल कपडे, ओढणी, गमछा घालून मशीनजवळ काम करू नये
  • मशीनमध्ये अडथळा आल्यास पूर्णपणे बंद केल्याशिवाय दुरुस्ती करू नये
  • शेतकरी व मजुरांना यांत्रिक साधनांमुळे होणाऱ्या धोक्यांची पूर्वकल्पना देणे आवश्यक
  • कारखाने व कंत्राटदारांनी सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे लागू करावेत

शेतीमध्ये आधुनिक यांत्रिक साधनांचा वापर वाढत असताना मानवी जीव सर्वात मौल्यवान आहे. योग्य काळजी, प्रशिक्षण आणि नियमांची अंमलबजावणी झाल्यास असे दुर्दैवी अपघात टाळता येऊ शकतात.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत