लातूर : औसा तालुक्यातील आशिव येथे ऊसतोडीसाठी वापरण्यात येणाऱ्या हार्वेस्टर मशीनमध्ये अडकून शंकर प्रभाकर सावंत (वय ४०) या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. बाजूला पडलेला ऊस मशीनमध्ये टाकताना त्यांचा तोल जाऊन ते मशीनमध्ये अडकले. सहकाऱ्यांनी मशीन बंद केले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरू […]

