SmartThings Find App: Find a lost smartphone
तंत्रज्ञान

SmartThings Find App: इंटरनेट आणि मोबाइल नेटवर्क शिवाय शोधणार हरवलेला स्मार्टफोन

सॅमसंग कंपनीने SmartThings Find नावाचे एक जबरदस्त अॅप बनवले आहे. सॅमसंग गॅलेक्सी स्मार्टफोन, गॅलेक्सी वॉच, टॅबलेट किंवा इयरबड्सला शोधणे आता सोपे होणार आहे. अॅपचे खास वैशिष्ट्य म्हणजे इंटरनेट आणि मोबाइल नेटवर्क विना सॅमसंग गॅलेक्सी डिवाइस शोधण्यास मदत करते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कंपनीने या अॅप विषयी डिटेल शेयर केले आहेत. यानुसार, स्मार्टथिंग्स फाइंड अॅप मध्ये ब्लूटूथ लो एनर्जी (BLE) आणि अल्ट्रा वाइडबँड टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. या टेक्नोलॉजीच्या मदतीने डिव्हाईसला शोधता येते. डिव्हाइसला लोकेट केल्यानंतर अॅप युजरला मॅप आणि साउंडद्वारे लोकेट करण्यात आलेल्या डिव्हाईसपर्यंत पोहोचते.

सॅमसंगचे हे अॅप अँड्रॉयड ८ आणि त्यानंतरच्या ओएस वर काम करणाऱ्या गॅलेक्सी स्मार्टफोन्स आणि टेबलेट वर काम करते. तसेच Tizen 5.5 किंवा त्यानंतरच्या ओएसवर काम करणाऱ्या गॅलेक्सी वॉचेच सोबत कंपेटिबल आहे. गॅलेक्सी बड्स प्लस आणि गॅलेक्सी बड्स लाइव्हला या फीचरसाठी ओएस अपडेट मिळणे सुरू झाले आहे.

सॅमसंगने सांगितले की, डिव्हाइसला ३० मिनिटापर्यंत ऑफलाइन ठेवल्यानंतर त्यात बीएलई सिग्नल निघतात. ते दुसरे डिव्हाइस रिसिव करु शकतात. यानंतर स्मार्ट थिंग्स अॅप त्या सिग्नल सोबत युज करू शकतो. जे हरवलेल्या डिव्हाईसला सर्च करण्यासाठी वापरता येतात.

ही सर्विस युज करणारा कोणताही जवळचा गॅलेक्सी डिव्हाइस सॅमसंग सर्वरला लोकेशनची माहिती देतो. त्यानंतर सॅमसंग ही माहिती युजर्सपर्यंत पोहोचतो. डिव्हाइसच्या जवळ पोहोचण्यासाठी तुम्ही रिंग करू शकता किंवा पुन्हा AR आधारित सर्चद्वारे ते शोधू शकता. याचे खास वैशिष्ट्य असे कि, एन्क्रिप्शनमुळे युजरचा डेटा पूर्णपणे सुरक्षित राहतो.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत