फेसबुकने मेसेंजर आणि इंस्टाग्रामसाठी व्हॅनीश मोड (Vanish Mode) नावाचे एक नवीन फीचर आणले आहे. हे फीचर अमेरिकेत सुरू झाले असून लवकरच विविध देशांमध्ये रोलआऊट केले जाईल. नवीन फीचरद्वारे व्हॅनिश मोडमध्ये टेक्स्ट, फोटो आणि व्हॉइस मेसेज पाहिल्यानंतर आपोआप डिलीट होतील.
यूजर्सना अॅपच्या सेटिंग्ज मेनूवर जावे लागेल, तिथून ऑप्शन एनेबल करता येणार आहे. यूजर्स आपल्या गरजेनुसार हा ऑप्शन डिसेबल देखील करु शकतील. फेसबुक मेसेंजरवर आधीपासूनच एक सीक्रेट कन्वर्सेशन फीचर देण्यात आलेलं आहे. ज्याच्या मदततीने यूजर्स एंड-टू-एंड एनक्रिप्टेड चॅट करु शकतात. यावेळी सीक्रेट चॅटवेळी ज्या काही फाईल्स असतील त्या फेसबुक सर्व्हरवर नव्हे तर यूजर्सच्या फोनमध्ये स्टोर होतील. मीडिया रिपोर्टनुसार, फेसबुकचे नवीन फीचर व्हॅनिश मोड केवळ वैयक्तिक चॅट्सवरच काम करेल. हे फीचर ग्रुप चॅटसाठी नसेल. फेसबुकने अलीकडेच आपल्या मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवर एक सेल्फ डिलीटिंग फीचर लॉन्च केले आहे. या फीचरमध्ये व्हॉट्सअॅपवर जेव्हा मेसेज रिसीव्हर पाहिल तेव्हा तो आपोआपच डिलीट होईल.