POCO M3 will be launched in India today

POCO M3 आज भारतात होणार लॉन्च, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

गॅझेट्स तंत्रज्ञान

POCO M3 आज भारतात लॉन्च होत आहे. इव्हेंटची सुरुवात दुपारी 12 वाजता होईल. लॉन्च दरम्यान या स्मार्टफोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि उपलब्धता याविषयी माहिती देण्यात येणार आहे. हा स्मार्टफोन POCO M2 चा अपग्रेड म्हणून भारतात लॉन्च केला जाईल. भारतात POCO M2 लाँच झाल्यापासून त्याच्या 1 दशलक्षहून अधिक युनिट्सची विक्री झाली होती.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

भारतात POCO M3 दुपारी 12 वाजल्यापासून लॉन्च होईल आणि POCO M3 ची जागतिक किंमत 4 जीबी + 64 जीबी व्हेरिएंटसाठी 149 डॉलर्स (सुमारे 11,000 रुपये) ठेवली गेली होती. म्हणजेच, POCO M3 ची प्रारंभिक किंमत भारतात 10 हजार रुपयांच्या आसपास असू शकते. कंपनीकडून वर्ष 2021 मधील हा पहिला लॉन्च इव्हेंट असेल.

POCO M3 स्पेसिफिकेशन्स :

  1. 6.53 इंच FHD + डिस्प्ले
  2. स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर, अँड्रॉइड 10 बेस्ड MIUI 12
  3. 6,000 mAh बॅटरी
  4. 6 जीबी रॅम
  5. 18 W फास्ट चार्जिंग सपोर्ट
  6. 48 एमपी ट्रिपल कॅमेरा सेटअप, 8 एमपी फ्रंट कॅमेरा
  7. साइड माउंट फिंगरप्रिंट सेन्सर
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत