भारतातील प्रसिद्ध बॅटल रॉयल गेम पबजी मोबाइलवर बंदी घातल्यानंतर युजर्संना कोणताही इंडियन गेम ऑप्शन उपलब्ध नव्हता. त्यानंतर FAU-G: Fearless and United Guards ची घोषणा करण्यात आली होती. या गेमच्या लाँचिंगची उत्सूकता युजर्संना लागली आहे. या मेड इन इंडिया गेमला आता Google Play Store वर लिस्ट करण्यात आले आहे.
गुगल प्ले स्टोअरवर लिस्टेड होऊनही सर्व अँड्रॉयड युजर्स या गेमला इन्स्टॉल करू शकणार नाही. सध्या Studio nCore केवळ युजर्संना गेमसाठी प्री रजिस्टर करण्याचे ऑप्शन देत आहे. एकदा या गेमचे प्री रजिस्ट्रेशन झाल्यानंतर या गेमला लाँच करण्यात येणार आहे. त्यानंतर युजर्संना नोटिफिकेशन पाठवण्यात येणार आहे. या प्रमाणे प्री रजिस्टर करणाऱ्या युजर्संना सर्वात आधी गेम डाउनलोड आणि इंस्टॉल करता येईल.
लिस्टिंगवरून गेममध्ये फॉलो करणाऱ्या स्टोरी लाइनची आयडिया आवश्यक आहे. हा गेम भारतातील उत्तर सीमेवरील डोंगरावर आधारीत आहे. या ठिकाणी आठ फायटिंग ग्रुप्स देशाचे संरक्षण करीत आहेत. प्ले स्टोरवर गेम डिस्क्रिप्शनमध्ये लिहिले आहे की, प्लेयर FAU-G कमांडोज ची स्पेशल यूनिट जॉइन करतील आणि सीमेवर संरक्षण करतील. या ठिकाणी यांची टक्कर शत्रूशी होईल. यात म्हटले आहे की, हा गेम भारतीय जवानांना समर्पित केलेला आहे.