नवी दिल्ली : कंपनी Vivo ने बजेट सेगमेंट अंतर्गत एक नवीन फोन भारतात लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन Y सीरीज अंतर्गत लॉन्च करण्यात आला आहे. Vivo Y12G मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे. त्यासोबत क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४३९ प्रोसेसर दिला आहे. हा फोन ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज या एकाच व्हेरियंट मध्ये येतो. Vivo Y12G च्या सिंगल व्हेरियंटची किंमत १० हजार ९९० रुपये आहे. आपण हा फोन Vivo India च्या ऑनलाइन स्टोअरवरून खरेदी करू शकता. हा फोन दोन कलरमध्ये उपलब्ध आहे. ज्यात फँटम ब्लॅक आणि ग्लेशियर ब्लूचा समावेश आहे.
Vivo Y12G चे फीचर्स :
- या फोनमध्ये ६.५१ इंचाची हेलो फुल व्ह्यू एचडी प्लस एलसीडी स्क्रीन दिली आहे. याचा पिक्सल रिझोल्यूशन 1600×720 आहे.
- या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४३९ प्रोसेसर दिले आहे.
- यात गेमर्ससाठी मल्टी टर्बो ३.० दिले आहे. हे FunTouchOS 11 वर आधारित अँड्रॉयड ११ वर काम करते.
- याचे इंटरनल स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते.
- फोनला पॉवर देण्यासाठी 5000 एमएएचची बॅटरी दिली आहे. AI पावर-सेविंग टेक्नोलॉजी सोबत आहे. हे वायर्ड रिव्हर्स चार्जिंग फीचरला सपोर्ट करते.
- सिक्योरिटीसाठी फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर दिले आहे. सोबत फेस अनलॉक फीचर दिले आहे.
- फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा प्रायमरी सेन्सर १३ मेगापिक्सलचा आहे. दुसरा २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. फोनचा कॅमेरा व्हर्टिकली दिलेला आहे. हे एलईडी फ्लॅश सोबत येते. सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा सेन्सर दिला आहे.
- कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये वाय फाय, ब्लूटूथ व्हर्जन ५.०, जीपीएस आणि ४ जी सारखे फीचर्स दिलेले आहेत.




