Political leaders in the district have got into the habit of settlement - Sujay Vikhe Patil

शेतकऱ्यांसाठी काही करू शकलो नसतो तर राजीनामा तरी दिला असता – डॉ. सुजय विखे

महाराष्ट्र

अहमदनगर : थकीत वीज बिल वसुलीसाठी शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करणे अन्यायकारक आहे. आपण जर मंत्री असतो तर हा अन्याय सहन केला नसता. यावर काहीच करू शकलो नसतो तर शेतकऱ्यांसाठी राजीनामा तरी दिला असता,’ असं भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी म्हटलं आहे. कर्डिले यांची जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा राहुरीत डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

डॉ. सुजय विखे यांनी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले कि, “राहुरी तालुक्यातील जनतेच्या आशीवार्दाने येथील आमदाराला मंत्रिपद मिळाले. त्यातही शेतकऱ्यांच्या दृष्टीने ऊर्जा हे महत्वाचे खाते मिळाले आहे. मात्र, मंत्रिपद असून जर हे लोकप्रतिनिधी आपल्याच मदतदारसंघातील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवू शकत नसतील तर त्याचा काय उपयोग? अशांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही. आमचे सरकार असते तर आम्ही अशी वेळच येऊ दिली नसती. एकाही शेतकऱ्याच्या डीपीला हात लावू दिला नसता. बाकीच्या राज्याचे सोडा, पण किमान आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना तरी नक्कीच संरक्षण दिले असते. त्यावेळी जर अधिकाऱ्यांनी ऐकले नसते, तर शेतकऱ्यांसाठी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असता.”

विखे पुढे बोलताना म्हणाले कि, “आम्ही लॉटरी लागून मंत्री किंवा आमदार कधीच झालेलो नाही. आमच्या रक्तात संघर्ष आहे. आम्ही संघर्ष करून पदे मिळवतो. कोणी आमच्यावर उपकार केलेले नाहीत. सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेने आम्हाला डोक्यावर घेतल्याने आम्ही इथपर्यंत आलो आहोत. आम्ही त्या जनतेसाठी आहोत, ही भावना आमच्यामध्ये आहे.”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत