doctor commits suicide at health center shocking incident in ahmednagar district

डॉक्टरची आरोग्य केंद्रातच आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिलेल्या कारणामुळे अहमदनगर जिल्ह्यात खळबळ

अहमदनगर : डॉक्टरने आरोग्य केंद्रातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातल्या करंजी येथे ही घटना घडली. डॉ. गणेश शेळके असं आत्महत्या केलेल्या डॉक्टरांचं नाव असून त्यांनी सुसाईड नोटमध्ये आत्महत्येला तालुका वैद्यकीय अधिकारी, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी जबाबदार असल्याचे लिहीले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करंजी येथील प्राथमिक […]

अधिक वाचा
Firing on A Gram Panchayat member in Nevasa

धक्कादायक : ग्रामपंचायत सदस्यावर गोळीबार, पाच गोळ्या झाडून हल्लेखोर पसार

अहमदनगर : नेवासा तालुक्यात बऱ्हाणपूर ग्रामपंचायत सदस्यावर पाच गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली असून त्यामध्ये हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर नगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोर पळून गेले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बऱ्हाणपूर ग्रामपंचायतीचे सदस्य संकेत चव्हाण मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास कांगोणी […]

अधिक वाचा
balasaheb thorat

महसूलमंत्री थोरात यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, यंत्रणा कमी पडतेय म्हणत नमूद केल्या अनेक त्रुटी…

अहमदनगर : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नुकताच अहमदनगर जिल्ह्याचा दौरा केला. या वेळी त्यांनी ठिकठिकाणच्या कोविड केअर सेंटरला भेटी दिल्या. त्यानंतर त्यांनी निरीक्षणे पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना कळविली आहेत. स्वत:च्या जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील त्रुटी दाखवून दिल्या आहेत. यात सुधारणा करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात थोरात यांनी म्हटले आहे, आपण नगर जिल्ह्याचा तालुकानिहाय दौरा […]

अधिक वाचा
Civil Hospital Vandalised After Covid Patient Death

धक्कादायक! रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांकडून रुग्णालयात तोडफोड; डॉक्टरांवर गंभीर आरोप

नगर : अहमदनगर जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाइकांनी तोडफोड केली. डॉक्टरांनी योग्य उपचार न केल्याने आणि ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्ण दगावल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. मिळालेल्या माहिती नुसार, नगर तालुक्यातील वाकडी या गावातील कोरोनाबाधित रूग्णावर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. आज सकाळी या रुग्णाचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी योग्य […]

अधिक वाचा
Former Union Minister of State Dilip Gandhi dies due to corona

माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांचं कोरोनामुळं निधन

अहमदनगर : माजी केंद्रीय राज्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप गांधी यांचं आज कोरोनामुळं निधन झालं. ते ७० वर्षांचे होते. दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर दिल्लीतच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. काही दिवसांपासून ते दिल्लीतच राहत होते. त्यांनी नुकतीच कोरोना चाचणी करून घेतली […]

अधिक वाचा
Rekha Jare's murder case: District Sessions Court rejects Bal Bothe's pre-arrest bail

रेखा जरे खून प्रकरणातील आरोपी बाळ बोठेच्या अडचणीत वाढ, न्यायालयाने दिला ‘हा’ महत्वाचा निर्णय

अहमदनगर : रेखा जरे यांच्या खुनाला तीन महिने उलटून गेले आहेत. परंतु या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याला फरार घोषित करण्याच्या मागणीसाठी चार दिवसांपूर्वी पारनेरच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी झाली असून बाळ बोठेच्या अडचणीत वाढ झाली आहे. बाळ बोठेला फरार घोषित करण्याच्या मागणीचा […]

अधिक वाचा
Political leaders in the district have got into the habit of settlement - Sujay Vikhe Patil

शेतकऱ्यांसाठी काही करू शकलो नसतो तर राजीनामा तरी दिला असता – डॉ. सुजय विखे

अहमदनगर : थकीत वीज बिल वसुलीसाठी शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करणे अन्यायकारक आहे. आपण जर मंत्री असतो तर हा अन्याय सहन केला नसता. यावर काहीच करू शकलो नसतो तर शेतकऱ्यांसाठी राजीनामा तरी दिला असता,’ असं भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी म्हटलं आहे. कर्डिले यांची जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा राहुरीत डॉ. सुजय […]

अधिक वाचा
Rekha Jare

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची धारदार शस्त्राने हत्या

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पारनेर तालुक्यातील जतेगाव घाटात त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे अनेकांना मोठा धक्का बसला असून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांनी या घटनेबाबत […]

अधिक वाचा
sujay vikhe with khadse

खासदार सुजय विखे यांची खडसेंच्या पक्षांतराबद्दलची प्रतिकिया..

अहमदनगर : खासदार सुजय विखे यांना खडसेंच्या पक्षांतराबद्दल विचारलं असता ते म्हटले , एकनाथ खडसे हे ज्येष्ठ नेते होते. मी भाजपमध्ये नव्हतो, त्या आधीपासून ते पक्षात होते. ते गेल्यामुळे पक्षाला निश्चितच नुकसान होणार आहे. पण तो वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे. मी पक्षात नवीन आहे. मला एकच वर्ष झाले. त्यामुळे एक वर्ष पक्षात असणारा व्यक्ती ४० […]

अधिक वाचा
Dr. Balasaheb Vikhe Patil autobiography

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन

नगर   : भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील दिवंगत पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मकथेचं प्रकाशन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. या प्रकाशन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील हेदेखील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (13 ऑक्टोबर) सकाळी […]

अधिक वाचा