kajwa festival in maharashtra
ब्लॉग

महाराष्ट्रात कुठे आणि कधी सुरु असतो ‘काजवा महोत्सव’? जाणून घ्या.

पुणे : रात्रीच्या वेळी दिसणारे काजवे प्रत्येकासाठी आकर्षण असतात. तसेच काजव्यांचा समून दिसणे ही तर एक पर्वणीच ठरते. क्वचितच असे प्रसंग घडतात. जून महिन्यात अनेक ठिकाणी ‘काजवा महोत्सव’ सुरू होतात. या ठिकाणी भेट देऊन तुम्ही काजव्यांच्या असंख्य समूहांना एकत्र पाहण्याचा आनंद घेऊ शकता.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आपण अनेकदा चित्रपटांमध्ये काजव्यांचे समूह पाहिले असतील. रात्रीच्या वेळी दिसणाऱ्या काजव्यांचा समूह पाहणे एक पर्वणीच असते. परंतु आता तुम्ही प्रत्यक्षात अशा क्षणांचा आनंद घेऊ शकता. कारण जून महिन्यात महाराष्ट्रात काही ठिकाणी ‘फायरफ्लाइज फेस्टिव्हल म्हणजेच काजवा महोत्सव सुरू होतो. तुम्हाला या महोत्सवाचा आनंद घ्यायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला त्याविषयी माहिती देत आहोत. हा महोत्सव जून अखेरपर्यंत सुरु राहतो.

महाराष्ट्रातील राजमाची गाव, सिद्धगड वाडी, प्रबळमाची गाव, भंडारदरा, घाटघर, कोथळीगड, कोंढाणे लेणी आणि पुरुषवाडी यांसह अनेक ठिकाणी महिनाभर चालणाऱ्या या महोत्सवासाठी शिबिरे आयोजित केली जातात. अशा परिस्थितीत पर्यटक येथे जाऊन हा महोत्सव पाहू शकतात आणि रात्री ट्रेकिंग, हायकिंग आणि कॅम्पिंगचा आनंद घेऊ शकतात. काजवे हे निसर्गाचे असे वरदान आहे ज्याच्या प्रकाशाने दऱ्या-खोरे आणि जंगले उजाळून निघतात.

जाणून घ्या कोठे, कधीपर्यंत सुरू असतात काजवा महोत्सव? (तारखा अंदाजे आहेत? साधरणतः मे-जून मध्ये असतात)

  1. पुरुषवाडी फायरफ्लाइज फेस्टिव्हल – 26 जूनपर्यंत
  2. राजमाची फायरफ्लाइज ट्रेक आणि कॅम्प 25 जूनपर्यंत
  3. लोणावळ्याजवळ राजमाची फायरफ्लाइज फेस्टिव्हल – 4 जून आणि 5 जूनपर्यंत
  4. भंडारदरा फायरफ्लाइज फोटोग्राफी बूट कॅम्प – 4 जून आणि 5 जूनपर्यंत
  5. माळशेज घाट फायरफ्लाइज कॅम्पिंग – 25 जूनपर्यंत

तुम्हालाही शहराच्या प्रकाश आणि प्रदूषणापासून दूर जाऊन काजव्यांच्या प्रकाशाचा आनंद घ्यायचा असेल तर या उत्सवाचा एक भाग व्हा आणि येथे कॅम्पिंगपासून ट्रेकिंगपर्यंतच्या कार्यक्रमांचा आनंद घ्या. या ठिकाणी तुम्हाला काजव्यांचा हळूवार आणि तालबद्ध वावर पाहायला मिळणार आहे. हे काजवे पावसाळ्यापूर्वी लाखोंच्या संख्येने बाहेर पडू लागतात आणि याच काळात त्यांची संततीही वाढवतात. मानवी हस्तक्षेपामुळे काही ठिकाणी काजव्यांची संख्या कमी होत आहे. परंतु राज्यातील या काही ठिकाणी अजूनही काजवे मोठ्या संखेने पाहायला मिळतात. पुढच्या वर्षी नक्की प्लॅन करा…

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत