Maharashtra Weather Updates rain forecast Konkan Western Maharashtra Vidarbha
अहिल्यानगर पुणे महाराष्ट्र

पुण्यासह नगरमध्ये पुढील 3 ते 4 तासांत जोरदार पाऊस, वादळी वारे वाहण्याची शक्यता…

पुणे : पुढील 3 ते 4 तासांत पुणे, अहमदनगर जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर 30-40 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची देखील शक्यता आहे. अशा परिस्थितीत घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पुण्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, या ढगाळ वातावरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात दिवसाच्या तापमानात २-३ अंश सेल्सिअसची घट होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वादळाचा अंदाज लक्षात घेता, मुंबईतील IMD च्या प्रादेशिक हवामान केंद्राने पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये पुढील 3 ते 4 तासांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच येथील रहिवाशांना जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत