Swift and private bus accident on Nagar-Aurangabad highway
महाराष्ट्र

नगर-औरंगाबाद महामार्गावर स्विफ्ट आणि खासगी बसचा भीषण अपघात, ५ ठार

स्विफ्ट कार आणि खासगी बसच्या झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. नगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासा तालुक्यात देवगड फाट्याजवळ आज (२२ फेब्रुवारी) रात्री दोनच्या सुमारास हा अपघात झाला. कारमधील पाच मृत व्यक्ती जालना जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, स्विफ्ट कार औरंगाबादहून अहमदनगरकडे येत होती. या कारने देवगड फाट्याजवळ खासगी ट्रॅव्हल बसला समोरून धडक दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कारमधील पाचही जखमींना स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने नेवासा फाट्याजवळील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच त्या सर्व जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, बसमधील सर्वजण सुरक्षित आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत