the new strain of corona found in Maharashtra being more dangerous

चिंता वाढली, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत आढळला कोरोनाचा नवा स्ट्रेन, शास्त्रज्ञांनी व्यक्त केली ‘ही’ भीती

कोरोना महाराष्ट्र

नवी दिल्ली : कोरोनाचा नवीन स्ट्रेन यवतमाळ, अकोला आणि विदर्भातील काही भागात आढळून आला आहे, अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे. त्यातच आता आणखी चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरीया यांनी महाराष्ट्रात आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक असल्याचं म्हटलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

डॉ. गुलेरीया यांनी म्हटलं आहे कि, या नव्या स्ट्रेनमुळे हर्ड इम्युनिटी मिळवणं कठीण आहे. अगोदर कोरोनाच्या अँटीबॉडी तयार झालेल्या व्यक्तींनाही पुन्हा कोरोनाचं संक्रमण होण्याची देखील शकता त्यांनी वर्तवली आहे. भारतात आतापर्यंत कोरोनाचे 240 नवीन स्ट्रेन आढळले आहे. त्यातच कोरोनावरील लस नव्या स्ट्रेन विरोधात पुर्णपणे प्रभावी नाही. मात्र, करोना लसीकरणामुळे नव्या स्ट्रेनच्या प्रसारावर काही प्रमाणात रोख लावता येईल, असंही ते म्हणाले आहेत.

कोरोनाचा नवीन स्ट्रेन हा कोरोना व्हायरसच्या वाढत्या संख्येचे मुख्य कारण आहे. गेल्या आठवड्यापासून देशात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोना टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी म्हणाले, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना संक्रमित रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. याचे कारण कोरोनाचा नवीन स्ट्रेन असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत