A big blow to the Congress, the Congress government collapsed in Puducherry

काँग्रेसला मोठा धक्का, पुदुच्चेरीत काँग्रेसचं सरकार कोसळलं

राजकारण

पुदुच्चेरी : पुदुच्चेरीत विधानसभेत व्ही नारायणसामी सरकारला बहुमत सिद्ध करण्यात अपयश आलं आहे. यानंतर मुख्यमंत्री नारायणसामी यांनी नव्या नायब राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला, अशी माहिती मिळत. त्यामुळे काँग्रेस – डीएमके आघाडीचं सरकार कोसळलं. हा काँग्रेससाठी मोठा धक्का आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

विश्वासदर्शक ठरावादरम्यान काँग्रेस आणि डीएमकेच्या आमदारांनी ‘वॉक आऊट’ करत सदनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यानंतर विधानसभा अध्यक्षांनी सरकारला बहुमत सिद्ध करण्यात अपयश आल्याची घोषणा केली.

त्याआधी बोलताना मुख्यमंत्री व्ही नारायणसामी म्हणाले कि, “सरकार स्थापन केल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचं सहकारी कृषी कर्ज माफ केलं. छोट्या शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान मोदी ६ हजार रुपये देत होते तर आम्ही ३७,५०० रुपये शेतकऱ्यांना दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी नायब राज्यपाल किरण बेदी यांनी आम्हाला थोपवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु आम्ही जनतेच्या हितासाठी काम करत राहिलो.”

पुदुच्चेरी विधानसभेत एकूण ३३ जागा आहेत. यातील ३० सदस्य आमदार म्हणून निवडून येतात तर तीन सदस्यांची नेमणूक केंद्र सरकारकडून करण्यात येते. काँग्रेस सरकारनं २०१६ साली निवडणुकीत १५ जागांवर विजय मिळवला होता. डीएमकेच्या दोन आणि एक अपक्ष आमदारांनी काँग्रेसला समर्थन जाहीर केलं होतं. मात्र, त्यानंतर मागील काही आठवड्यांत ६ आमदारांनी राजीनामा दिला. विरोधी आघाडीकडे १४ सदस्य, तर सात जागा रिक्त आहेत. त्यामुळे नारायणसामी सरकारवर बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली होती. पण विश्वासदर्शक ठरावात बहुमत सिद्द न करता आल्याने काँग्रेसचं सरकार कोसळलं आहे.

महत्वाचं म्हणजे, येत्या एप्रिल-मेमध्ये पुदुच्चेरीमध्ये विधानसभा निवडणुक होणार आहे. त्याआधीच व्ही नारायणसामी सरकार कोसळलं आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत