mp mohan delkar found dead in mumbai hotel

ब्रेकिंग : खासदार मोहन डेलकर यांचा मृतदेह आढळला, आत्महत्येचा संशय

महाराष्ट्र मुंबई

मुंबई : खासदार मोहन डेलकर यांचा मृतदेह मुंबईतील हॉटेलमध्ये आढळला. त्यांचा मृतदेह आज (२२ फेब्रुवारी) मुंबईतील  मरीन ड्राईव्ह परिसरात एका हॉटेलमध्ये आढळला आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिस तेथे पोहोचले आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, पोलिसांनी याबाबत अद्याप प्रतिक्रिया दिलेली नसून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मोहन डेलकर दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष खासदार आहेत. 1989 मध्ये मोहन डेलकर पहिल्यांदा या मतदार संघातून खासदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर ते अनेक वेळा खासदार झाले. मोहन देलकर हे भारतीय नवशक्ती पक्षाच्या वतीने खासदार झाले. 2009 मध्ये ते कॉंग्रेस पक्षात गेले. तथापि, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत