Superstar Rajinikanth will announce his political party on December 31

सुपरस्टार रजनीकांत ३१ डिसेंबरला करणार राजकीय पक्षाची घोषणा

राजकारण

सुपरस्टार रजनीकांत यांनी आपला राजकीय पक्ष सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. आज (गुरूवारी) रजनीकांत यांनी ट्वीट करत ३१ डिसेंबर रोजी आपल्या राजकीय पक्षाची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती दिली. तसंच त्यांचा राजकीय पक्ष जानेवारी महिन्यापासून कार्यरत होईल असंही सांगितलं.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

यापूर्वी सोमवारी त्यांनी आपला पक्ष रजनी मक्कल मंदरमच्या जिल्हा सचिवांची भेट घेतली होती. तसंच लवकरच आपला राजकीय पक्ष सुरू करण्याबाबत माहिती देणार असल्याचं म्हटलं होतं. रजनीकांत यांच्या समर्थकांनी त्यांना राजकारणापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता, त्याच वेळी ही भेट झाली होती. दरम्यान, चर्चा केल्यानंतरच रजनीकांत यांनी राजकीय पक्षाचा विचार केला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत