First arrest under Love Jihad Ordinance in Uttar Pradesh
देश

उत्तर प्रदेशात लव्ह जिहाद अध्यादेशातंर्गत पहिली अटक

उत्तर प्रदेशात लव्ह जिहाद विरोधात नवीन अध्यादेश लागू करण्यात आला आहे. बरेलीमध्ये या अध्यादेशातंर्गत पहिला एफआयआर नोंदवण्यात आला. या प्रकरणात आरोपी ओवैस अहमदला (२१) बुधवारी अटक करण्यात आली. हिंदू मुलीला इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी जबरदस्ती केल्याचा तसेच मुलीच्या पालकांनी धर्मांतरावर आक्षेप घेतल्यानंतर त्यांना धमकावल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ओवैसचे हिंदू मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. मागच्यावर्षी ते पळून गेले. त्यावेळी ओवैसला अटक झाली होती. मुलीच्या वडिलानी त्याच्यावर अपहरणाचा आरोप केला होता. मुलीने तो आरोप फेटाळून लावला. एप्रिल महिन्यात मुलीच्या कुटुंबीयांनी तिचे दुसरीकडे लग्न लावून दिले.  “मुलीचे लग्न झाल्याचे समजल्यापासून ओवैस मुलीच्या कुटुंबीयांना त्रास देत आहे. मुलीला परत बोलवा. मुलीने धर्मांतर करून दोघांचे लग्न लावून देण्यासाठी कुटुंबीयांवर दबाव टाकत आहे” असे या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. शनिवारी तो मुलीच्या घरी गेला होता. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रार नोंदवली असे एसएचओ दया शंकर यांनी सांगितले.

लव्ह जिहाद विरोधी बनवलेल्या नव्या कायद्यातंर्गत १० वर्ष तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. आरोपी ओवैस अहमद विरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर पोलीस त्याच्या मागावर होते. आयपीसीच्या कलम ५०४, ५०६ आणि ‘विधि विरुद्ध धर्म संपरिवर्तन प्रतिषेध अध्यादेश 2020’ अंतर्गत त्याच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत