2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील खटल्याची नियमित सुनावणी 3 डिसेंबरपासून सुरू होत असल्यानं या खटल्यातील आरोपी साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित यांच्यासह इतर सर्व आरोपींना कोर्टात हजेरी लावण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयानं जारी केले आहेत.
या प्रकरणात जवळपास ४७५ साक्षीदार आहेत. परंतु आतापर्यंत फक्त १४ साक्षीदारांच्या जबाब नोंदवण्यात आला आहे. १२ वर्ष झाली तरी हे प्रकरण प्रलंबित आहे. अनलॉकनंतर राज्यभरातील सर्व कनिष्ठ कोर्टांचं नियमित कामकाज आता सुरू झालेलं आहे. त्यामुळे या प्रलंबित खटल्यातील सुनावणींचा वेग वाढवण्याचा निर्णय विशेष एनआयए कोर्टानं घेतला आहे. त्यामुळे आजपासून या खटल्याची नियमित सुनावणी होणार आहे.