पुणे : टिकटॉक स्टार समीर गायकवाड याने गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी पुण्यातील वाघोली परिसरात त्याच्या घरात संध्याकाळी समीरचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळून आला. मात्र, समीरच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, समीरने स्वतःच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. काहीवेळाने त्याचा चुलत भाऊ प्रफुल्ल गायकवाड तिथे पोहोचला. त्यानंतर या घटनेची माहिती लोणीकंद पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन समीरला खाली उतरवले. त्याला नजीकच्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. दरम्यान, काही दिवसांपासून तो नैराश्यात असल्याची माहिती मिळत आहे.