Explosion at Gharda Chemical Company in Lotte MIDC, Ratnagiri

ब्रेकिंग : रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीतील घारडा केमिकल कंपनीत स्फोट, तीन कामगार ठार

महाराष्ट्र रत्नागिरी

रत्नागिरी : रत्नागिरीतील लोटे एमआयडीसी मधील घारडा केमिकल कंपनीत स्फोट झाला आहे. या कंपनीच्या ७ नंबरच्या प्लांटमध्ये २ स्फोट झाल्याची माहिती मिळत असून या स्फोटानंतर कंपनीला आग लागली आहे. दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, या स्फोटात कंपनीतील तिघांचा मत्यू झाला असून काही कर्मचारी जखमी झाले आहेत. केमिकल अंगावर पडल्यामुळे जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. हा स्फोट नेमका कशाचा होता आणि कशामुळे झाला याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, कंपनीत आग लागल्याने काही कर्मचारी कंपनीतच अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत