IND vs ENG 5th T20 : आज भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या टी -20 मालिकेतील निर्णायक आणि अखेरचा सामना खेळला जाणार आहे. चौथ्या टी -20 सामन्यात भारताच्या रोमहर्षक विजयानंतर मालिका 2-2 अशी बरोबरीत आहे. त्यामुळे हा सामना जिंकून ही सिरीज जिंकण्याचे प्रयत्न दोन्ही संघांकडून केले जाणार आहेत. हा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरु होईल.
भारतीय टीम : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर.
इंग्लंड टीम : इयोन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलिंग्ज, जोस बटलर (यष्टीरक्षक), सॅम कुरन, टॉम कुरन, ख्रिस जॉर्डन, लिम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मालन, आदिल राशिद, जेसन रॉय, बेन स्टोक्स , रीस टोपली आणि मार्क वुड.




