Coca Cola suffer $4 billion loss after Cristiano Ronaldo 'bottle' incident

रोनाल्डोने पाजलं पाणी! ‘कोका कोला’च्या बाटल्या बाजूला केल्याने कंपनीला २९ हजार ३५२ कोटींचं नुकसान

क्रीडा

पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने पत्रकार परिषदेदरम्यान कोका कोलाच्या बाटल्या बाजूला केल्याने ब्रँडला मोठा फटका बसला आहे. युरो कप २०२२ स्पर्धेनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान रोनाल्डोने कोका कोलाच्या बाटल्या बाजूला सरकावल्या, त्यामुळे कंपनीला तब्बल चार बिलियन डॉलर्स (जवळपास २९ हजार ३५२ कोटींचे) नुकसान झाले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

रोनाल्डो यूरो कप २०२० स्पर्धेत ‘ग्रुप ऑफ डेथ’ अशी ओळख असलेल्या ‘एफ’ गटात हंगेरीविरोधात होणाऱ्या सामन्याआधी पत्रकार परिषदेसाठी आला होता. यावेळी त्याने समोर ठेवलेल्या कोका कोलाच्या दोन बाटल्या बघितल्या. त्यानंतर रोनाल्डोने त्या बाटल्या बाजूला केल्या आणि तिथे असलेली पाण्याची बाटली हातात घेऊन ‘पाणी’ असं म्हणाला.

परंतु, रोनाल्डोची ही कृती कोका कोला कंपनीला इतकी महागात पडली की कंपनीचे शेअर्स १.६ टक्क्यांनी खाली घसरले आणि कंपनीला तब्बल चार बिलियन डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागले. कंपनीची किंमत २४२ बिलियन डॉलर्सवरुन २३८ वर आली आहे.

रोनाल्डोला सर्वात तंदुरुस्त अ‍ॅथलीट म्हणूनही ओळखले जाते. रोनाल्डो कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंकचा चाहता नाही, तो त्याच्या चाहत्यांना त्याऐवजी पाणी पिण्याचा सल्ला देतो. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ काही मिनिटांतच व्हायरल झाला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत