मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण झाली आहे. सचिनने स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्याला कोरोनाची काही लक्षणं जाणवल्यामुळे त्याने कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. सचिन सध्या घरीच विलगीकरणात आहे. सचिनच्या घरातील इतर सर्वांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.
सचिनने म्हटलं आहे कि, “कोरोनाची काही लक्षणं जाणवल्यामुळे त्याने कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. घरातील इतर सर्वांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मी सध्या घरीच विलगीकरणात आहे. मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व नियमांचे पालन करत आहे. मी सर्व आरोग्यसेवा तज्ज्ञांचे आभार मानतो, ज्यांनी मला देशभरातील सर्वांना आधार दिला. सर्वांनी काळजी घ्या.”
— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 27, 2021