Earth Hour will be celebrated tonight at 8.30 pm

आज रात्री साजरा होणार अर्थ आवर, पृथ्वीसाठी छोटंसं योगदान, जाणून घ्या…

ग्लोबल देश

नवी दिल्ली : दर वर्षी मार्चच्या शेवटच्या शनिवारी रात्री साडेआठ वाजता जगभरातील कोट्यावधी लोक एका तासासाठी लाईट बंद करतात आणि पृथ्वीच्या उन्नतीसाठी एकत्रित होतात. हा दिवस जगभर अर्थ-आवर (Earth Hour) म्हणून ओळखला जातो. यावर्षी, अर्थ आवर दिन 27 मार्च रोजी आला आहे. यानिमित्ताने जगातील 180 हून अधिक देशांतील लोक रात्री ८.30 ते ९.30 या वेळेत त्यांच्या घरातील दिवे बंद ठेवतील आणि उर्जेची बचत करून पृथ्वी वाचवण्यासाठी एकतेचा संदेश देतील.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर (WWF) या वन्यजीव आणि पर्यावरण संघटनेने 2007 मध्ये अर्थ आवर डेची सुरुवात केली होती. 31 मार्च 2007 रोजी प्रथमच अर्थ आवर दिन साजरा करण्यात आला. ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे याचे प्रथम आयोजन करण्यात आले होते. यात लोकांना 60 मिनिटांसाठी सर्व दिवे बंद ठेवण्याची विनंती केली गेली होती. हळूहळू हे संपूर्ण जगभरात साजरे होऊ लागले.

अर्थ-आवरचा उद्देश :

  1. अर्थ अवर डे ही वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचरची मोहीम आहे, ज्याचा हेतू ऊर्जा बचत आणि पर्यावरण संरक्षणाबद्दल लोकांना जागरूक करणे आहे.
  2. याचा हेतू निसर्गास होणारी हानी रोखणे आणि मनुष्याचे भविष्य सुधारणे हा आहे.
  3. आज अर्थ अवर डे एक चळवळ बनली आहे. पर्यावरण तज्ज्ञांचे म्हणणे आहे की वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचरच्या या जागतिक मोहिमेची मदत हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंग या समस्येविरुद्ध लढण्यासाठी होईल.

अर्थ आवर दिनानिमित्त लोकांना रात्री 8.30 ते 9.30 या वेळेत आपली घरी आणि कामाच्या ठिकाणी दिवे बंद ठेवण्याचे आवाहन केले जाते. २००9 मध्ये भारत या मोहिमेचा एक भाग झाला. २००९ मध्ये भारताने पहिला अर्थ-आवर दिन साजरा केला. यात 58 शहरांमधील 5 दशलक्ष लोकांनी सहभाग घेतला होता. २०१० मध्ये भारताच्या १२8 शहरांमधील 7 दशलक्षाहून अधिक लोकांनी या उपक्रमात भाग घेतला. त्यानंतर ही संख्या वाढत गेली.

या ऐतिहासिक इमारतींवरील दिवे देखील केले जातात बंद :

पॅरिसस्थित आयफेल टॉवर, न्यूयॉर्कची एम्पायर स्टेट बिल्डिंग, दुबईची बुर्ज खलिफा, अथेन्समधील अ‍ॅक्रोपोलिस ही दरवर्षी अर्थ आवर मध्ये सहभाग घेणार्‍या 24 जागतिक स्थळांपैकी आहे. भारतात अर्थ आवर दरम्यान राष्ट्रपती भवन, संसद भवन आणि इंडिया गेटसह अनेक ऐतिहासिक इमारतींमधील दिवे बंद करण्यात येतात.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत