Sonam Malik

अर्धांगवायूवर मात करत रचला इतिहास : राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा दोन वेळा जिंकणारी सोनम मलिक पहिली महिला

क्रीडा महिला विशेष

नवी दिल्ली : हरियाणाच्या 18 वर्षीय सोनम मलिकने 2016 ऑलिम्पिकची पदक विजेती साक्षी मलिकला हरवून राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा (National Wrestling Championship) जिंकली. तिने 62 किलो गटात साक्षीला 7-5 ने हरवून सुवर्णपदक जिंकले. साक्षीवर सोनमचा हा सलग तिसरा विजय आहे. तिने 2020 मध्ये आशियाई चॅम्पियनशिप आणि आशियाई ऑलिम्पिक क्वालिफायरमध्ये साक्षीला पराभूत केले होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सोनम मलिकबद्दल काही खास गोष्टी :

 1. ज्या हाताला अर्धांगवायू, त्याच हाताने साक्षीला पराभूत केले
  सोनम भारतीय कुस्तीची नवी स्टार मानली जात आहे. तिने साक्षीला राईट आर्म लॉकने पराभूत केले. दोन वर्षांपूर्वी सोनमच्या याच उजव्या हाताला अर्धांगवायू झाला होता. याच उजव्या हातामुळे, तिची कारकीर्द सुरू होण्याआधीच धोक्यात आली होती. आज तिने त्याच हाताने साक्षीला पराभूत केले.
  2017 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर सोनमच्या उजव्या हाताला समस्या झाली होती. सुरुवातीला, कोचला ही साधारण दुखापत वाटली. नंतर या वेदनेबरोबरच सोनमने घरगुती स्पर्धेत भाग घेणे सुरूच ठेवले. 2018 मध्ये स्टेट चॅम्पियनशिप स्पर्धेदरम्यान तिच्या हाताला अर्धांगवायू झाला आणि नंतर तिला ही स्पर्धा मध्येच सोडावी लागली.
 2. डॉक्टरांनी कुस्ती सोडायला सांगितले पण सोनम हरली नाही
  सोनमने 6 महिने बेड रेस्ट घेतली होती. तिला हात वरदेखील करता येत नव्हता. डॉक्टरांनी सांगितले होते की सोनमला  आपले कुस्तीचे स्वप्न सोडावे लागेल. मात्र, सोनम आणि तिच्या वडिलांनी हार मानली नाही. आर्थिक अडचणीमुळे सोनमच्या वडिलांनी तिच्यावर आयुर्वेदिक उपचार केले. या औषधांचा चांगला परिणाम झाला आणि सोनम बरी झाली.
 3. सोनम बरी होऊन खेळात परतली आणि इतिहास रचला
  सोनम बरी होऊन पुन्हा आली आणि तिने 2019 मध्ये दुसऱ्यांदा वर्ल्ड कॅडेट रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्यापूर्वी तिने 2017 मध्ये देखील ही चॅम्पियनशिप जिंकली होती. हे विजेतेपद दोन वेळा जिंकणारी सोनम पहिली महिला कुस्तीपटू आहे.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत