आयपीएलचा 49 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात दुबईत आज सायंकाळी ७.३० वाजल्यापासून रंगणार आहे. प्ले-ऑफ रेसमध्ये टिकून राहण्यासाठी कोलकाताला हा सामना जिंकावा लागेल. जर संघ हरला तर प्ले-ऑफसाठी अन्य संघांच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागेल. तर यापूर्वीच स्पर्धेतून बाहेर पडलेल्या चेन्नईला दोन्ही सामने जिंकण्याची इच्छा असेल.
मागील सामन्यात कोलकाताने चेन्नईला 10 धावांनी पराभूत केले होते. गुणतालिकेत कोलकाता 12 गुणांसह 5 व्या स्थानावर आहे. कोलकाताने हंगामात 12 पैकी 6 सामने जिंकले आहेत आणि तितकेच पराभूत झाले आहेत. त्याचबरोबर चेन्नई 8 गुणांसह 8 व्या स्थानावर आहे. चेन्नईने 12 पैकी 4 सामने जिंकले आहेत आणि 8 गमावले आहेत.
चेन्नईचा सक्सेस रेट 59.37% आहे. चेन्नईने आतापर्यंत लीगमध्ये एकूण 177 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 104 जिंकले आहेत आणि 72 गमावले आहेत. एक सामना अनिश्चित होता. कोलकाताचा सक्सेस रेट 52.10% आहे. कोलकाताने आतापर्यंत एकूण 190 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 98 सामन्यात विजय मिळवला आहे आणि ९२ सामने गमावले आहेत.
दुबईतील खेळपट्टी फलंदाजांना मदत करू शकेल. येथे स्लो विकेट असल्याने स्पिनर्सनाही खूप मदत होईल. नाणेफेक जिंकणार्या संघाला प्रथम फलंदाजी करायला आवडेल.